एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकSwara Bhaskar Viral Tweet On Nagpur Riot: नागपूरची दंगल विक्की कौशलमुळे झाली; स्वरा भास्करचं ट्वीट व्हायरल, पण 'ती' म्हणतेय...
Swara Bhaskar Viral Tweet On Nagpur Riot: अभिनेत्री स्वरा भास्करच्या दोन पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की, 'छावा' चित्रपट माथी भडकावणारा होता.
By : नामदेव जगताप|Updated at : 26 Mar 2025 10:29 AM (IST)
Swara Bhaskar Viral Tweet On Nagpur Riot
Source :
ABP MajhaSwara Bhaskar Viral Tweet On Nagpur Riot: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आपल्या परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असते. स्वरा बऱ्याचदा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत असते. तसेच, ती सोशल मीडियावरही (Social Media) सक्रिय असते. एवढंच काय तर ती, विरोधी पक्षांवरही टीका करताना मागेपुढे पाहत नाही. सध्या तिच्या नावानं दोन ट्वीट व्हायरल होत आहेत. यापैकी एका ट्वीटमध्ये तिनं विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाच्या निर्मात्यांवर नागपूरची दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं कौतुक केलं आहे. तसेच, एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला आहे. पण, यातली महत्त्वाची बाब म्हणजे, स्वरानं केलेल्या पोस्टमध्ये एक ट्वीस्ट आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करच्या दोन पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की, 'छावा' चित्रपट माथी भडकावणारा होता. नागपूर दंगलींसाठी विक्की कौशल आणि निर्माते जबाबदार आहेत. चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं लिहिलंय की, कुणाल कामराचा कॉमेडी शो हे एक आर्ट आहे. या तोडफोडीला शिंदेंचे समर्थक जबाबदार आहेत.
Both these tweets being circulated by RW ecosystem are fake. Neither is tweeted by me. Pls check your facts everyone. @grok pic.twitter.com/dMEm0CWo05
— Swara Bhasker (@ReallySwara) March 25, 2025
स्वरा भास्करच्या व्हायरल ट्वीटमागील सत्य नेमकं काय?
स्वरा भास्करच्या नावानं सोशल मीडियावर दोन ट्वीट व्हायरल होत आहेत. तसेच, नेटकरी तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. पण, अशातच स्वरा भास्करनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं सांगितलं की, हे व्हायरल होणार ट्वीट मुळात तिनं केलेलेच नाहीत. प्लीज तुम्ही सर्वांनी फॅक्ट्स चेक करा..., असंही तिनं सर्वांना सांगितलं आहे. स्वरानं खोट्या पोस्ट्सचे अनेक स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले आहेत. त्यावर तिनं लिहिलंय की, "मूर्ख उजव्या विचारसरणीचे लोक पुन्हा तेच करायला लागलेत, जे ते चांगलं करू शकतात. खोटे फोटो आणि मीम्स पसरवणं.
RW idiots back to what they do best- spreading fake images and memes. pic.twitter.com/8Mw1UQbiAU
— Swara Bhasker (@ReallySwara) March 25, 2025
स्वरा भास्करनं सत्य काय ते सांगून पोस्ट केल्यानंतर काहीजण त्यांच्या सपोर्टमध्ये आले आहेत. दोघांनी व्हायरल पोस्टच्या गुणवत्ता पाहून हे खोटं असल्याचं सांगितलं. म्हणाले की, स्वराच्या खऱ्या प्रोफाईलचा फोटो आणि या पोस्टच्या फोटोंमध्ये खूप अंतर आहे.
दरम्यान, स्वरा भास्करच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिची पुढची फिल्म 'मिसेज फलानी' आहे. फिल्मची शुटिंग पूर्ण झाली आहे, पण, निर्मात्यांनी अद्याप याची रिलीज डेट जाहीर केलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Dhanashree-Yuzvendra Chahal Divorce Reason: खरं कधी लपत नाही... धनश्री आणि युजवेंद्रचा घटस्फोट का झाला? सत्य समोर आलंच
Published at : 26 Mar 2025 10:29 AM (IST)
Tags :
Swara Bhaskar Kunal Kamra Viral Tweet Vicky Kaushal BOLLYWOOD Chhaava Nagpur Riot
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
MI vs RCB IPL 2025 : रजत नावाचे सोने!
Opinion